येस बँकेची सेवा पूर्ववत; आरबीआयने निर्बंध उठवल्याचे येस बँकेकडून ट्विट


मुंबई : आर्थिक अडचणीत आलेल्या खासगी क्षेत्रातील येस बँकेचे व्यवहार आजपासून पूर्ववत झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बँकेच्या व्यवहारावर आणलेले निबंध रिझर्व्ह बँकेने आज सायंकाळी ६ वाजता उठवले असल्याचे ट्विट येस बँकेने केले आहे. त्यानुसार ग्राहकांसाठी तत्काळ सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच उद्या गुरुवारपासून बँकेच्या नेहमीच्या वेळेत ग्राहकांनी व्यवहार करावेत, असेही स्पष्ट केले आहे. कर्ज वाटपातील अनियमितता आणि बँकेची आर्थिक स्थिती नाजूक बनल्याने रिझर्व्ह बँकेने ५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले होते. तसेच ग्राहकांना खात्यावरून केवळ पन्नास हजार रुपये काढण्याची परवानगी दिली होती. मात्र आरबीआयने आज बँकेवरील निर्बंध उठवले असून सर्व सेवा पूर्ववत होणार असल्याचे येस बँकेने ___ म्हटले आहे. दरम्यान, खातेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जाण्याची शक्यता असल्याने बँकने ३० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.