दमदाटी करून कंपनी बंद केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा

कोरोनाच्या नावाखाली खासगी कंपनीमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करून सुरक्षारक्षकाला दमदाटी करीत कंपनीतील व्हिडीओ काढून व्हायरल केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १९ ते २१ मार्चदरम्यान विमाननगर परिसरातील खासगी कंपनीत घडली. विशाखा गायकवाड आणि विजय गायकवाड अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेतयाप्रकरणी संबंधित कंपनी प्रशासनाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १९ मार्चला विशाखा आणि विजय विमाननगर परिसरातील एका खासगी कंपनीत जाऊन तेथील सुरक्षारक्षकाला दमदाटी केली. कोरोनामुळे कंपनी बंद करा, नाहीतर तुमच्या बॉसला उचलून नेतोतुम्हाला कोरोना व्हायरसचे गांभीर्य नाही, असा आरोप करीत कंपनीतील काम सुरू असल्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत दोन दिवसांपर्वी हे दोघे नगर रस्त्यावरील खासगी कंपनीत गेले. कामगारांना कोरोनाची बाधा झाल्यावर कंपनी जबाबदार असेल, असे सांगून कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढले याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.