आवक घटल्याने सर्वच फळभाज्या महागल्या

मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटली



कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्नेटयार्डातील फळबाजार, तरकारी आणि कांदाबटाटा विभाग येत्या शुक्रवारीपासून रविवारपर्यंत बंद होता. रविवारचा क! पहाटेपर्यंत वाढविण्यात आलात्यामुळे सोमवारी बाजारात सुमारे आवक ६० टक्क्यांनी घटली. त्या तुलनेत मोठी मागणी झाल्याने आज सर्वच फळभाज्यांच्या भावात मोठी वाढ झाली. सलग तीन दिवसांच्या बंदमुळे बाजारात खरेदीदारांनी शेतमालाची खरेदी केलीयामुळे सर्वच शेतीमालाची विक्री होऊन दुपारी बाराच्या आतच बाजार समितीमध्ये शुकशुकाट झाला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून मार्केटयार्डातील फळेभाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद होता. पुणे बाजार समितीमधील व्यवहार सोमवारी (दि.२३) सुरू झाले. आज बाजारात फक्त ४० ते ५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. सरासरी आवकेच्या केवळ ४० टक्के भाजीपाल्याची आवक झाली होती. भाजीपाल्याला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भावात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. रविवारच्या 'जनता कप!'ची वेळ सोमगारच्या पहाटेपर्यंत वाढविल्याने परराज्यांसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाल्याची आवक झाली नाही, तर कय॑मळे शेतकऱ्यांनीदेखील शेतीमाल काढला नसल्याने आवक कमीच राहिली. मात्र, सलग तीन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामळे सर्वच शेतीमालाची विक्री होऊन दुपारी १२ वाजता बाजार समितीमध्ये शकशकाट झाला होता.