नवाब मलिक यांची माहिती
मुंबई,- भीमा येथील दंगल ही सुनियोजित होती ही आमच्या पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लेखी प्रतिज्ञापत्र दिले आहे. शिवाय चौकशी आयोगाने शरद पवार यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार येत्या ४ एप्रिलला शरद पवार हे आयोगासमोर येऊन साक्ष देतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक पत्रकार यांनी परिषदेत दिली.
_कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नवाब मलिक म्हणालेमाजी मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्यांनी चौकशी आयोगाला सहकार्य केलेले नाही. लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून तसे कळवलेही नाही. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत विचारण्यात आले असता म्हणाले, चौकशी आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल जनतेला कळेलच. संसदेचे अधिवेशन असल्याने शरद पवार ४ एप्रिल रोजी चौकशी आयोगासमोर जाणार आहेत. चौकशी आयोगाची मुदत ही ८ एप्रिलला संपणार असली तरी अन्य आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.