देशात १५२ रुग्ण, लष्करातही शिरकाव: एक जवान पॉझिटिव्ह

डोक्याला ताप; पंजाबमधून १६७ संशयित पळाले


नवी दिल्ली/लेह, दि. १८ (वृत्तसंस्था) - देशात २४ तासांत रुग्णांची संख्या १४ ने वाढली आहे. आतापर्यंत १५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. लष्करातही 'कोरोना'ने शिरकाव केला असून, लेह-लडाखमध्ये एका जवानाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेजण मुंबई, दिल्ली आणि कर्नाटकातील रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ झाली आहे. । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व सरकारी कार्यालये आठ दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला.


देशभरातील रेल्वेचे ६० टक्के बुकिंग रद्द झाले आहेतब्बल १५० विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.


विदेशात अडकलेल्या २७६ हिंदुस्थानींना लागण धार्मिक आणि व्यावसायिक कामासाठी विदेशात गेलेल्या २७६ हिंदुस्थानी नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २५५ जण इराणमध्ये आहेतहाँगकाँगमध्ये एक, इटलीत ५, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी एक तसेच सौदी अरेबियात १२ हिंदुस्थानींना कोरोनाची लागण झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या सर्वांवर तेथेच उपचार सुरू आहेत. यापूर्वी इराणमधून ५०९ हिंदुस्थानींना मायदेशी आणले आहे.